महिला सरपंच मारहाण प्रकरणाला नवे वळण: सीसीटीवी फुटेज समोर आले!!!!!

महिला सरपंच मारहाण प्रकरणाला नवे वळण: सीसीटीवी फुटेज समोर आले!!!!!

पुणे

पुण्यातील कदमवाकवस्ती येथे महिला सरपंचाला झालेल्या मारहाणप्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. या मारहाणीपूर्वीचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये आधी सरपंच गौरी गायकवाड यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सुजीत काळभोर याच्या कानशिलात लगावल्याच दिसून आलं आहे. त्यांच्याबरोबरच इतर काही लोकही त्याला मारहाण करत असताना या फुटेज दिसत आहे.

या प्रकरणातील आरोपी सुजीत काळभोर यानं आपल्यालाच सरपंच गौरी गायकवाड यांनी मारहाण केल्याचा दावा करणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आणलं आहे. त्यानं म्हटलं, “मी शुक्रवारी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेलो होतो. त्यावेळी मी रांगेत उभा असताना माझ्या मागून येणारे काही लोक पुढे जात होते. या ठिकाणी अविनाश बडदे नावाचा मुलगा टोकन वाटत होता. याबाबत मी त्याला जाब विचारल्यानंतर आमच्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी शेजारी गौरी गायकवाड उभ्या होत्या. त्यांनी मला न विचारता माझ्या दोन कानशिलात लगावल्या आणि माझी कॉलरही पकडली. त्याचवेळी त्या खाली पडल्या. मी त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला तर तोच व्हिडिओ त्यांनी व्हायरल करुन मला मारहाण झाल्याचं सांगितलं. उलट सीसीटीव्ही फुटेजनुसार मलाच चार-पाच जणांनी मारहाण केली आहे. या घटनेची तक्रार देण्याची मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सरपंच गायकवाड यांनी माझ्याविरोधातच तक्रार दिली. आता माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की, फुटेज पाहून पोलीस प्रशासनानं मला न्याय द्यावा अन्यथा मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.”

या प्रकरणातील नव्या वळणावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “या प्रकरणाची दुसरी बाजू समोर येत असताना हे लक्षात आलंय की, ३ तारखेला ही घटना घडली. वैयक्तिक कारणावरुन सुरुवातीला सरपंच गौरी गायकवाड यांनी सुजीत काळभोर याच्या थोबाडीत मारली. त्यांची कॉलर पकडून त्यांना शिविगाळ केली. यावेळी कॉलर सोडवताना हात जोरात बाजूला करताना गौरी गायकवाड खाली पडल्या. त्यानंतर त्या खाली पडल्यानंतरचा व्हिडिओ आपल्यासमोर आला. पण त्याच्या आधीची पार्श्वभूमी समोर आली नव्हती. आज जो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते स्वतः मारहाण करत असल्याचं दिसून आलं आहे. याबाबत सुजीत काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण एका महिलेचा सन्मान म्हणून ते याबाबत दोन दिवस काहीही बोलले नाहीत. पण काल चित्रा वाघ यांनी त्या गावात जाऊन तिथं स्थानिक पातळीवर वाद निर्माण केला.

सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना सरपंच गायकवाड यांनी म्हटलं होतं की, “मला अजुनही न्याय मिळाला नाही. सुजीत काळभोरने मला मारहाण केली. महिला सरपंच चांगलं काम करत असेल तर तिला हिंसेला सामोरं जावं लागतं”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *