महिलांवर अत्याचाराची लाट आलीय !!!!    चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना

महिलांवर अत्याचाराची लाट आलीय !!!! चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाना

मुंबई

महिलांच्या सुरक्षेवर दोन दिवसांचे विशेष सत्र बोलावण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या उत्तर पत्राने राज्यातील राजकारण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ‘महिलांवरील अत्याचाराच्या रोजच्या घटना पाहता असे म्हणता येईल की राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी महिलांवर अत्याचाराची  तिसरी लाट आहे’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

भाजपने साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिलांची सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर दोन दिवसीय विशेष सत्राची मागणी केली होती. ज्या अंतर्गत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला दोन दिवस विशेष अधिवेशन बोलावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून महाराष्ट्रात सर्व काही ठीक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तर भाजप शासित राज्यांमध्ये महिलांवर अधिक अत्याचार होत असल्याचं मुख्यमंत्री पत्रात म्हणाले, असं वाघ म्हणाल्या आहेत.

महिला असल्याने मी खूप अस्वस्थ आहे. हे कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र असल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्री स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणवतात. पण या कुटुंबप्रमुखाला माहीत आहे की महाराष्ट्रात त्याच्या नाकाखाली काय चालले आहे? बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या अशा घटना रोज घडत राहतात. तर यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात काय गैर आहे? मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेले पत्र महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या राज्याच्या महासंचालकांना बोलावून या काळात राज्यात किती महिलांचे अपहरण केले आहे ते शोधावे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *