पुरंदर
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नारायणपुर येथील मंदिरात तीन ते चार महिलांनी तब्बल 50 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घडली असून यासंदर्भात कौशिक बाळासाहेब सुतार वय 27 वर्ष राहणार म्हांगुळे पाडळे ता. मुळशी जिल्हा पुणे यांनी सासवड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री क्षेत्र नारायणपूर येथे फिर्यादी कौशिक बाळासाहेब सुतार यांच्या पॅन्टच्या खिशातील रक्कम रुपये 50 हजार तीन ते चार महिलांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबतीत सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासवड पोलिस पुढील तपास करीत आहे.