महावितरण अधिकार्याचा प्रताप !!!!! ती येताच फिरवायचा “या” वरुन हात ; महावितण अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

महावितरण अधिकार्याचा प्रताप !!!!! ती येताच फिरवायचा “या” वरुन हात ; महावितण अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद

औरंगाबाद महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. आपल्या कार्यालयात महिला आल्यावर टेबलवर ठेवलेला पेपर वेटच्या आकारातील नग्न अवस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून हात फिरवून अधीक्षक अभियंता वाईट नजरेने त्यांच्याकडं पाहात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित महिला काही कामानिमित्त अधीक्षक अभियंता यांच्या केबिनमध्ये गेल्यावर टेबलवर ठेवलेल्या पेपर वेटच्या आकाराच्या नग्नावस्थेतील महिलेच्या स्टीलच्या कोरीव प्रतिमेवरून मुद्दाम हात फिरवायचे तसेच वाईट नजरेने पाहायचे असे तिने पालिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

ही बाब अनेकदा पिडितेस खटकली. मात्र त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु दिवसेंदिवस हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने अखेर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनूसार प्रवीण दरोली (अधीक्षक अभियंता) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *