महायुतीत खटके?   “तर आम्ही वेगळा विचार करू”;अजित पवार गटाचा भाजपला इशारा

महायुतीत खटके? “तर आम्ही वेगळा विचार करू”;अजित पवार गटाचा भाजपला इशारा

पुणे

लोकसभा निवडणुकीतील राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवारांच्या राष्ट्रवादीस जबाबदार धरले जात आहे. तसेच काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझेशन या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होते. त्यामुळे महायुतीतील काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत.

असे असताना आता अजित पवारकडून पहिल्यांदाच भाजपला थेट इशारा देण्यात आला आहे. महायुतीच्या पराभवास अजित पवारांना जबाबदार धरल्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी भाजपला दिला आहे. 

अमोल मिटकरी म्हणाले की,  ”भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,” अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता महायुतीत खटके उडायला सुरूवात झाल्याच चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *