पुरंदर
पुरंदर तालुक्यात खुप मोठ्या महापुरुषांनी जन्म घेतलाय. अशाच एका महापुरुषाच्या जयंतीनिमित्त एका गावात गावच्या पदाधिकार्यांना आमंत्रित केल होत.
या कार्यक्रमात आजी माजी सरपंच तसेच सदस्य व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते व या कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्या पदाधिकार्याला महापुरुषांविषयी शुभेच्छा देण्यासाठी माईक दिला
परंतु त्या पदाधिकार्याने त्याचाच उधोउधो केला ऐकणार्याला वाटले की महापुरुषाबद्दल हे काहीतरी बोलतील परंतु त्यांनी स्वत:चाच उदोउदो केला.त्या महापुरुषाच नाव घेउन साध्या शुभेच्छा पण देता आल्या नाहीत ही हास्यास्पद गोष्ट आहे