पुणे
बारामती तालुक्यात भरधाव टेम्पोने 16 वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडलीये. निरा-मोरगाव रस्त्यावर जगतापवस्ती येथे निरा डाव्या कालव्याच्या वळणावर आयशर टेम्पोने एका 16 वर्षीय मुलाला चिरडल्याची घटना घडली. यामध्ये या मुलाचा जागीच मृत्यू झालाय.
मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिलाय. या अपघातात नीरा येथील पोकळे वस्तीत राहणारा इजाज खुर्शीद सय्यद याचा मृत्यू झालाय. अपघातानंतर संतप्त जमावाने हा आयशर टेम्पो पेटवून दिलाय. त्यामुळे काही काळासाठी या भागातील वातावरण तणावपूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान वडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमाव शांत केलाय.दरम्यान, बारामतीत 16 वर्षीय मुलाला टेम्पोने चिरडण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिला. त्यानंतर टेम्पो जवळपास जळून खाक झालाय.
अग्निशामक दलाकडून टेम्पोला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेच. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले आहे. टेम्पो पेटवून दिल्यानंतर काही काळ या भागात तणाव निर्माण झाला होता.