बावीस तारखेला मी अयोध्येत येणार नाही अस श्रीरामाने मला स्वप्नात येऊन सांगीतल;बड्या मंत्र्याच खळबळजनक विधान

बावीस तारखेला मी अयोध्येत येणार नाही अस श्रीरामाने मला स्वप्नात येऊन सांगीतल;बड्या मंत्र्याच खळबळजनक विधान

पुणे

अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम वेगाने सुरू असून २२ जानेवारीला मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण देखील तापलं आहे. विरोध आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अशातच बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी मंदिराबाबत मोठ वक्तव्य केलं आहे.

२२ जानेवारी रोजी श्रीराम अयोध्येला येणार नाहीत. श्रीरामाने माझ्या स्वप्नात येऊन मला तसं सांगितलं आहे, असं खळबजनक विधान तेज प्रताप यादव यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून भाजपवर जोरदार टीका देखील केली आहे.

प्रभु श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितलं की, ते येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ते अयोध्येला येणार नाहीत. सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे.

त्यामुळे मी त्या दिवशी तिकडे येणार नाही, असं श्रीरामांनी स्वप्नात येऊन मला सांगितलं आहे, असं तेजप्रताप यांनी म्हटलं आहे.

रविवारी डीएसएस या संघटनेच्या स्थापनादिनानिमित्त बिहारमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तेजप्रताप यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर बोचरी टीका देखील केली.

निवडणुका आल्या की मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कोणी विचारत नाही. कोणीही त्याबद्दल बोलत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *