बाळासाहेब स्वप्नात येऊन म्हणाले घाबरु नकोस तुझ्या घरात शिवसेना आहे;स्वप्नातील दृष्टांत पाहून मुलीचेच नाव ठेवले “शिवसेना”

बाळासाहेब स्वप्नात येऊन म्हणाले घाबरु नकोस तुझ्या घरात शिवसेना आहे;स्वप्नातील दृष्टांत पाहून मुलीचेच नाव ठेवले “शिवसेना”

मुंबई

माझं नाव शिवसेना. या आशयाच्या प्रचाराची क्लिप काही वर्षापासून शिवसेनेकडून निवडणुकीत वापरली जातेय. सद्या शिवसेनेत फूट पडली असून दोन गट पडलेत त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत. शिवसेनेवर बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या एका शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नावच चक्क शिवसेना ठेवलंय. या नावाची चर्चा कल्याण डोंबिवलीत सुरू झाली आहे.


पांडुरंग वाडकर हे डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात आपली पत्नी व दोन मुलींसह राहतात. पांडुरंग मूळचे महाड कीये येथील रहिवाशी आहेत. लहानपणापासून पांडुरंग हे शिवसेनेचे काम करत आहेत.पांडुरंग वाडकर यांना गेल्या १७ ऑक्टोंबर मुलगी झाली. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवलं. त्यांच्या मूळ गावी महाड येथील कीये मुलीचे बारसे झाले. त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवून त्यांनी त्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचाततीत केली आणि या नावाची चर्चा सुरू झाली.

एकीकडे शिवसेनेत दोन गट पडले असताना शेलार नाका येथे राहणारे वाडकर यांच्या स्वप्नात चक्क बाळासाहेब आले. त्यांनी सांगितले की, घाबरु नकोस, तुझ्या घरात शिवसेना आहे. वाडकर यांना झालेला स्वप्नातील दृष्टांत पाहून ते झोपेतून खडबडून जागे झाले. त्यांनी त्यांना पडलेले स्वप्न ध्यानात घेऊन त्यांच्या मुलीचे नावच शिवसेना ठेवले. त्यांच्या मुलीचे नाव शिवसेना ठेवून त्यांनी त्या नावाची नोंद ग्रुप ग्रामपंचाततीत केली आहे. त्यांच्या शिवसेना प्रेमाची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.याबाबत पांडुरंग वाडकर यांनी लहानपणापासून शिवसेनेचे काम करतोय सध्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे हे पाहून दुःख झालं.

१७ ऑक्टोबर रोजी रात्री झोपलो असताना अचानक बाळासाहेब स्वप्नात आले आणि मी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा बाळासाहेबांकडे ही खंत बोलून दाखवली.त्या क्षणाला बाळासाहेब बोलले तू घाबरू नकोस शिवसेना तुझ्या घरात आली आहे. पुढे बोलताना वाडकर यांनी सांगितलं की त्या क्षणाला मला माझ्या फोन आला व मुलगी झाल्याचा मला समजलं. त्यामुळे मी मुलीचं नाव शिवसेना असं ठेवल्याचा वाडकर सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *