बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी; तुम्ही गुगलवर गेला आणि फेकू नाव टाकलं तर…….

बाळासाहेब ठाकरे एक लाख मोदींना भारी; तुम्ही गुगलवर गेला आणि फेकू नाव टाकलं तर…….

पुणे

नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तुम्ही जिंकलात आणि मते मागितलीत. आमचे बाळासाहेब ठाकरे 1 लाख मोदींना भारी होते आणि आहेत,असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

बीड येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. राऊत म्हणाले की, काल आपले पंतप्रधान पुन्हा प्रकटले.

2 हजारच्या नोटांची बंडल कुणाकडे असेल तर ती 50 खोक्यांचा मंत्र्यांकडे आहेत. आज गरिबांची चूल पेटेल की नाही हा प्रश्न आहे. 

संजय राऊत म्हणाले,उद्धव ठाकरेंना मी अजूनही माजी मुख्यमंत्री म्हणत आहे. सुप्रीम कोर्टाने एका शब्दात सांगितलं हे सरकार घटनाबाह्य आहे. या शिंदे सरकारला लाज असती तर नैतिकतेच्या आधारावर यांनी राजीनामा दिला असता.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर बोलताना राऊत म्हणाले,तुम्ही गुगलवर गेलात आणि फेकू नाव टाकलं तर मोदींचा चेहरा येतो. या फेकू सरकारचा पराभव काल कर्नाटकमध्ये झाला. नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही जिंकलात असं म्हणतात. बाळासाहेब असल्या 1 लाख मोदींना भारी होते.

ते म्हणाले,आता हे 40 शिंदे गेलेत त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून दाखवावं. मी राजकारण सोडेन. या महाराष्ट्राचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. लोकांमध्ये चीड आहे. इतकी मोठी बेईमानी या महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *