पुरंदर हादरावणारी बातमी!!!          शिवतारे यांच्या हॉस्पिटलची चौकशी करा

पुरंदर हादरावणारी बातमी!!! शिवतारे यांच्या हॉस्पिटलची चौकशी करा

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील जनहितार्थ हॉस्पिटल सासवड हिवरे रोड तालुका पुरंदर जिल्हा पुणे याठिकाणी असणाऱ्या डॉक्टर सुभाष शिवतारे यांच्या हॉस्पिटलची चौकशी करण्याची मागणी पुणे जिल्हा ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष महेश राऊत यांनी जिल्हा शैल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय औंध या ठिकाणी एका पत्राद्वारे केली आहे.

सदर हॉस्पिटलमध्ये एमडी व एमएस डॉक्टर कधी उपलब्ध नसतात.तसेच दिनांक 01/01/2019 ते 11/08/2023 काळात हॉस्पिटलमध्ये किती लोक पॅनल मध्ये आहेत व त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र तपासणे,या काळात किती लोकांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले व कोणत्या डॉक्टरांनी केले, तसेच ऑपरेशन थिएटर सोडून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे सर्व डॉक्टरांची चौकशी करावी,हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णावर उपचार करायचे परवानगी दिली होती त्या काळात कोणत्या डॉक्टरांनी उपचार केले त्याची सीसीटीव्ही फुटेज मिळावे,ज्या एम डी व एम एस डॉक्टरांनी उपचार केले आहेत त्या डॉक्टरांचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे,या काळात उपचारानंतर अंतिम बिलामध्ये किती रक्कम जमा झाली त्या बिलांची चौकशी करावी,कुठल्या आधारे या हॉस्पिटलला परवानगी मिळाली त्या सर्व कागदपत्रांची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे.

सदर हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधुंदी कारभार एमडी व एम एस डॉक्टरांच्या नावाखाली डॉक्टर शिवतारे हे बीएचएमएस असुन करत आहेत. व गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. जर आपण वरील मुद्द्यांवर कारवाई केली नाही तर आमच्या संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महेश राऊत यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *