पुरंदर तालुक्यात भिषण कार अपघात!!!!     उभ्या पिकअपला भरधाव स्वीफ्टची धडक,स्विफ्टचा चक्काचूर;आठ जणांचा मृत्यु

पुरंदर तालुक्यात भिषण कार अपघात!!!! उभ्या पिकअपला भरधाव स्वीफ्टची धडक,स्विफ्टचा चक्काचूर;आठ जणांचा मृत्यु

पुणे

पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भिषण कार अपघात झाला आहे.स्वीफ्ट आणि पिकअपची धडक झाली.या अपघातात आठ जणांचा मृत्यु झाला आहे.

मृतांशिवाय पाच ते सहा जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.जेजुरी-मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाब्यासमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की स्वीफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार ( क्र. एमएच ४२, ए.एक्स. १०६०) जेजुरी ते मोरगाव जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअपला जोराने धडकली. या पिकअपचा क्रमांक एमएच १२ एक्सएम ३६९४ असा आहे. पिकअपमधील साहित्य खाली करीत असताना ही जोराची धडक झाली.

मृतांची नावे
सोमनाथ रामचंंद्र वायसे, रामु संजीवन यादव (रा. नाझरे कप ता. पुरंदर), अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), अक्षय शंकर राऊत ( रा. झारगडवाडी, ता. इंदापूर), अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेद्रे, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. आणखी एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *