पुरंदर
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुमित जगताप यांनी राष्ट्रवादी दरबाराचे आयोजन केले आहे.
राष्ट्रवादी दरबारासाठी आंबळे गावात काम करणारे सर्व शासकीय कर्मचारी उपस्थित राहणार असून लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे.
यावेळी तहसील कचेरी, ग्रामपंचायत विभाग, तलाठी कार्यालय, कृषी खाते, एमएसईबी विभाग, रेशनिंग विभाग, एसटी विभाग, वन विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, पेन्शन विभाग, आरोग्य विभाग, सोसायटी विभाग, पीडीसीसी बँक, पशुसंवर्धन विभाग, पोस्ट विभाग, अंगणवाडी विभाग, बचत गट विभाग, जलसंधारण विभाग या संबंधित प्रश्न ग्रामस्थांना मांडता येतील.
लोकांच्या अडचणी,समस्या यांचा पाठपुरावा ग्रामपंचायतीच्या मार्फत केला जाणार असल्याचे सुमित जगताप यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबळे गावचे उपसरपंच सचिन दरेकर, संदिप जगताप,
वैभव दरेकर,संकेत काळे,अक्षय शेंडगे,संतोष शेंबडे,आकाश जगताप,अजित जगताप,सौरभ जगताप,नाजीम शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.