पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वाघापूर गावामध्ये श्री संत योगीराज चांगवटेश्वर महाराज पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाचे वातावरणमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
श्रींची पालखी गावात आल्यानंतर भव्य ग्रामप्रदक्षिणा करून वाघापूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये श्रीच्या पादुकांची अभिषेक व आरती सरपंच सौ रेवती चांगदेव कुंजीर व चांगदेव कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर पालखी वाघापूर येथील पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय शाळेमध्ये सर्वांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांसाठी गावच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती जेवणानंतर पालखीचे पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाले.