पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वाघापुर या गावात वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता फेरीवाले,भंगारवाले,भोंदुबाबा,साधु तसेच अनोळखी व्यक्तींना फिरण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीने प्रसिद्धि पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.
तसेच गावात जे भाडेकरु आहेत त्यांची नोंद घरमालकाने ग्रामपपंचायतीला देणे बंधनकारक असल्याचे ग्रामपंचायतीने कळविले आहे.
वाढत्या चोरीच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी आपले गाव आपली जबाबदारी या भुमिकेतुन हा निर्णय घेतला आहे. : रेवती कुंजीर,सरपंच,वाघापुर
गावात जर कोणी अनोळखी इसम आढळला तर पोलिस पाटील किंवा सरपंच यांच्याशी संपर्क करावा असे ग्रामपंचायतीमार्फत विनंतीपुर्वक आवाहन करण्यात आले आहे.