पुरंदर तालुक्यातील “या” गावात शेतात पोल रोवण्याच्या वादातून वयस्कर पती पत्नीला मारहाण

पुरंदर तालुक्यातील “या” गावात शेतात पोल रोवण्याच्या वादातून वयस्कर पती पत्नीला मारहाण

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सासवड सोमर्डी येथे शेतजमिनीत पोल रोवण्याच्या वादातून पती पत्नीला मारहाण  केल्याची धक्कादायक घटना घडली असून सुनंदा मारुती कु-हाडे वय ६० वर्षे धंदा शेती रा. सोमुर्डी ता पुरंदर जि पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . 

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  दि .२७ मार्च २०२२ रोजी दुपारी १ .३० वा.चे दरम्यान व सायंकाळी ५  वा.चे दरम्यान पुरंदर तालुक्यातील  सोमर्डी गावचे हाद्दीत जमिन गट नं.५०४ मध्ये शेतजमिनीत पोल रोवलेचे वादाचे कारणावरुन आरोपी पाडुरंग काळुराम जगदाळे , गणेश बाळु जगदाळे ,सोमनाथ भाऊ जगदाळे तिघे रा. गराडे ता पुरंदर जि पुणे अजीत लक्ष्मण कु-हाडे रा. सोमर्डी ता पुरंदर जि पुणे यातील पाडुरंग काळुराम जगदाळे याने  फिर्यादी यांना कळखाचे काठीने डोक्यात व पाठीवर मारहाण केली.

त्यांचे पती हे भांडणे सोडविण्यास आले असता त्यांनाही काठीने मारहाण केली व इतर तिघांनी हाताने मारहाण करुन शिविगाळ दमदाटी केली व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *