सासवड
सासवड (ता पुरंदर) येथील गिरमेमळा येथे महेंद्र विलास गिरमे यांच्या शेतात असणाऱ्या समाईक विहीरी मध्ये कोणीतरी अज्ञात इसम पाण्यावर तरंगत आहे. याबाबत पोलिस स्टेशन सासवड यांना कळविले यावेळी पोलिस पथकासह त्यांच्या शेतामध्ये जावुन शहानिशा केली असता विहीरीमध्ये एक पुरूष जातीचे अनोळखी इसम मृत अवस्थेत दिसुन आला.
मयताचे वय अंदाजे ४२ वर्ष, रंग गोरा, उंची फुट, केस लांब, दाढी राखलेली, डावे छातीवर ढाल तलवार क्रॉस गोंदलेले, डावे हाताचे पोटरीवर सुनील शेट्टी गोंदलेले, उजवे हाताचे दंडावर महाकालीचे चित्र, अंगामध्ये फुल बाहिचा राखाडी रंगाचा काळे ठिपके असलेला शर्ट, निळ्या रंगाची फुल नाईट पँन्ट, पँन्टचे गुडघ्यावर ७ (SELFIE FASHION) असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले. सासवड पोलीसांनी भोर येथील रेस्कु टिमचे जगन गजानन शिर्के, संभाजी बाळासाहेब सांगळे, जनार्दन दत्तात्रय सांगळे यांचे मदतीने या मयत इसमास विहिरी बाहेर काढले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुहास लाटणे हे करीत आहे