पुरंदर तालुक्यातील “या” गावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक;एकाचा जागेवरच मृत्यु तर तीन जण जखमी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक;एकाचा जागेवरच मृत्यु तर तीन जण जखमी

पुणे

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा – बारामती मार्गावर दोन मोटासायकलींची समोरा समोर जोरदार धडक झाली. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये बंटी सुरेश गमंडे रा.आनंदनगर निंबुत या ३५ वर्ष व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला.

तुकाराम सुखदेव माने (२०) आणि तेजस राहुल शिंदे, इरफान आरिफ सय्यद रा.निंबुत (ता.बारामती) हे जखमी झाले आहेत.याबाबत नीरा पोलिसांनी मंगळवारी दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता दिलेल्या माहिती नुसार नीरा गावचे हद्दीत नीरा ते बारामती रोडवर बुवासहेब ओढ्यावरिल पुलावर बुवासाहेब मंदिराचे समोर मोटरसायकल क्र. एम. एच. ४२ डब्ल्यु ३४४८ व मोटरसायकल क्र. एम. एच. ४२ बी. एम. ३३२५ यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला.

अपघात नंतर  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन जखमींना लोणंद येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले व वाहतूक सुरळीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *