पुरंदर तालुक्यातील “या” गावात दारुबंदीसाठी उद्या होणार ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

पुरंदर तालुक्यातील “या” गावात दारुबंदीसाठी उद्या होणार ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

पुणे

कोडीत बुद्रुक व कोडीत खुर्द येथे खुलेआम व बेकायदेशीरपणे आणि अवैधरित्या सुरु असलेले दारूधंदे कायमस्वरूपी बंद करा, अशी मागणी कोडीत बु” ग्रामपंचायत व कोडीत खुर्द ग्रामपंचायत व दोन्ही गावातील ग्रामस्थांनी संबंधित विभागांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दोनी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी शुक्रवार दि. १९ रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे जिल्हा,अभिनव देशमुख उपविभागीय अधिकारी तथा पुरंदर – दौंडचे प्रांत, प्रमोद गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,पुरंदरच्या तहसिलदार रुपाली सरनोबत,सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप व उत्पादन शुल्क विभाग पुरंदर यांना लेखी निवेदन देण्यात आले होते,

ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कोडीत बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अवैद्यरित्या, खुलेआम सुरु असलेले दारुधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सासवड पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिलेली आहेत . ग्रामस्थ व महिलांनी मोर्चाचे नियोजन देखील केले होते.

परंतु ,आज तागायत सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने कोडीत गावातील अवैद्यरित्या सुरु असलेले दारुधंदे कायमस्वरूपी बंद करणेबाबत ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.दारुमुळे अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत,अनेक तरुण मुले व्यसनाधीन होत आहेत,तरं अनेक तरुण मुलांना लग्नापूर्वीचं मरण पत्कारावे लागले आहे,

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात कोडीत ग्रामस्थांनी गावातील अवैद्यरित्या सुरु असलेले दारुधंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, त्याअनुषंगाने उद्या सोमवार दि. २२ रोजी सकाळी ठिक १० – ०० वाजता कोडीत बु” व कोडीत खुर्द ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ मंदीरासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपोषणाच्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, सासवड व पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन, अवैधरित्या सुरू असलेले दारुधंदे तात्काळ बंद करण्यात यावेत.

याबाबत ग्रामस्थांना लेखी आश्वासन देण्यात यावे,अन्यथा कोडीत ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्यात येईल असा इशारा कोडीत बुद्रुक व खुर्द ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *