पुरंदर तालुक्यातील “या” गावात झाली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची चोरी

पुरंदर तालुक्यातील “या” गावात झाली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची चोरी

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे वीट भट्टी कामगाराच्या घरातून तब्बल १ लाख ७३ हजारची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रामचंद्र शांताराम सोनवणे वय 32 वर्ष धंदा मजुरी शेती रा.सोनोरी,ता पुरंदर,जि पुणे.यांनी  सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि .  १४ डिसेंबर २०२१ रोजी पहाटे ३ ते ४  दरम्यान  बाळासाहेब मार्तंड काळे रा. सोनोरी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विटभट्टीवर फिर्यादी मचंद्र शांताराम सोनवणे हे राहण्यास असलेल्या घरातुन प्रफ्फुल रोहीदास राठोड व वडील रोहीदास राठोड,पप्पु शर्मा,निरंजन राठोड,मुबारक शेख पुर्ण नाव माहीत नाही रा. कुरळा ,ता.कंधार, जि.नांदेड व रामसिंग,निरंजन पुर्ण नाव माहीत नाही.रा. छत्तीसगढ यांनी ८८ हजार रुपये किमतीची २२ ग्रँम वजनाची सोन्याची चैन , ८५ हजार रुपये   रोख रक्कम एकुण १ लाख ७३ हजार रुपायाचा मुद्देमाल चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे . सासवड पोलिसांनी या सर्व संशयतांवीरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सासवडचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. जाधव हे तपास करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *