पुरंदर
सासवड येथे काल गणपती विसर्जनादरम्यान फिर्यादी ऋशीकेश अर्जुन बांदल (वय 32 व्यवसाय शेती रा. म्हेत्रेपार्क साई पॅलेस) यांना धारदार शस्त्राने, बॅटने, काठीने, लाथाबुक्यांनी मारहान केली. शिवीगाळ दमदाटी केली. असल्या प्रकरणी संशयित आरोपी कौशिक राजेंद्र जगताप याने कोणालातरी फोन लावुन त्याचे सांगणे वरून त्याचे साथीदार गौरव दिलीप जगताप, ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे, सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप, पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप, कुनाल उर्फ नन्या दशरथ जगताप व त्याचे इतर 5 ते 6 सहकारी यांच्या विरोधात सासवड पोलिस स्टेशनला भा वि का कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506, 427 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत – मौजे सासवड येथील हुडेकरी चौक येथे गणपतीच्या मिरवणुकीत पुढे चला असे म्हणाल्याचे कारणावरून कौशिक राजेंद्र जगताप याने कोणालातरी फोन लावुन त्याचे सांगणे वरून त्याचे साथीदार गौरव दिलीप जगताप ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप कुनाल उर्फ नन्या दशरथ जगताप व त्याचे इतर 5 ते 6 सहकारी यांनी रात्री 10ः00 वा चे सुमारास सासवड येथील सिध्देश्वर वखार समोरील कौशिक जगताप याचे आॅफिसवर मामाचा मुलगा विक्रम जगताप याला जिवे मारण्याचे उददेशाने धारदार शस्त्राने, बॅटने,काठीने,लाथाबुक्यांनी मारहान केली. शिवीगाळ दमदाटी केली.
माझे आईला व मामीला अश्लील शिवीगाळ करून मामाचे घरा बाहेर उभी असलेली ईनिव्हा कार नं. एम.एच.12 पी.टी.6665 या गाडीचे पाठीमागील काच फोडुन नुकसान केले. तुमचा मुलगा मयुर व विकी यांना आज संपवतोच असे म्हणुन जिवे ठार मारण्याची उददेशाने धमकी दिली म्हणून माझी त्यांचे विरूध्द तक्रार आहे पुढील तपास सासर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के हे करीत आहे