पुरंदर तालुक्यातील “या” गावातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; मुद्देमालासहित आरोपीला घेतले ताब्यात !!!!!

पुरंदर तालुक्यातील “या” गावातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; मुद्देमालासहित आरोपीला घेतले ताब्यात !!!!!

पुरंदर

सासवड पोलिसांनी सासवड शहरातील बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे.

याबाबतीत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड  पोलीस स्टेशनचे सहा.  पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीनुसार सासवड शहरातील जेजुरी नाका परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडील शून्य ते नऊ असे अंक असलेल्या चित्रांवर पैसे देऊन बिंगो नावाचा जुगार खेळत आहे.  अशी बातमी मिळताच सहा.  पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी पोलिसांचे  पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला असता तेथे आरोपी निखिल संजय चव्हाण वय 22 वर्ष राहणारे इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा  खाली बसलेला होता व त्याच्याकडे एक कागदी बोर्ड त्यावर १ ,२ ,३ ,४ ,५ ,६ ,७ ,८,९,०  असे लिहिलेले दिसले.

त्याला  पोलिसांचा संशय आल्याने तो  पोलिसांना पाहून कावरेबावरे होऊन पळू लागला  असता त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला  पकडले व  पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की चिठ्ठीवर निघालेल्या लकी नंबर वर जो व्यक्ती  पैसे लावतो त्याला त्याने लावलेल्या पैशाच्या बदल्यात नऊ पट रक्कम दिली जाते असे सांगितले आरोपीचे अंग झडती घेतले असता त्याच्याकडून १३९० रुपये रोख रक्कम व ४  हजार रुपयांचा एक सिल्वर रंगाचा सॅमसंग मोबाईल असे एकूण ५,३९० /-  रुपयाचे  जुगाराचे साधने पोलिसांनी  ताब्यात घेतली असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 (अ ) प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे

सदरची कारवाई ही सासवडचे पोलीस निरीक्षक आणणासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पो.  कॉ.  प्रतीक धीवर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *