पुरंदर तालुक्यातील त्या हॉटेल मध्ये दारू पिऊन तळीरामांचा धिंगाणा ,बियर बॉटल आणि स्टील रॉडने मारहाण

पुरंदर तालुक्यातील त्या हॉटेल मध्ये दारू पिऊन तळीरामांचा धिंगाणा ,बियर बॉटल आणि स्टील रॉडने मारहाण

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील पानवडी येथील हॉटेल मध्ये तळीरामांनी  दारू पिऊन धिंगाणा घालत बियर बॉटल आणि स्टिल रॉडने  मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यासंदर्भात  रामराजे अंकुश काकडे वय 32 वर्ष धंदा बांधकाम व्यवसाय रा.काळेपडळ, सुयश सृष्टी, हडपसर यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सासवड पोलिसांनी भादवि कलम 326,504,506,34 अन्वये   आरोपी- 1)सचिन नारायण काशीद रा.संयोग कॉलनी काळेपडळ 2)नाना काटेकर रा.फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे यांंच्या विरोधात गुुन्हा दाखल केला आहे.


यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दि.30/08/2021रात्री 11:30 वा.चे सुमारास हॉटेल निसर्ग पानवडी ता.पुरंदर जि.पुणे  येथे समोर मोकळ्या जागेत आरोपी 1)सचिन नारायण काशीद रा.संयोग कॉलनी काळेपडळ व 2)नाना काटेकर रा.फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे यांनी संगनमत करून दारू पिऊन काही एक कारण नसताना शिवीगाळ करून सचिन याने हातातील बियरच्या बाटलीने माझे डावे कानावर व नाना याने स्टीलच्या रॉडने माझ्या कमरेवर मांड्यांवर मारहान करून अपखुशीने मोठी दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली यासंदर्भात सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *