पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून मारहाण करत “या” गावात तरुणाचा तलावाच्या पाण्यात फेकून खून

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना! दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून मारहाण करत “या” गावात तरुणाचा तलावाच्या पाण्यात फेकून खून

पुरंदर

पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाने येथे दारू पिण्याच्या पैशांच्या कारणावरून अक्षय संजय कुंभारकर वय २५ या तरुणाचा मारहाण करून तलावाच्या पाण्यात फेकून खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.

जेजुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव सुनील शशिकांत सावंत रा. सावंत वस्ती पारगाव मेमाणे ता. पुरंदर तर खुन झालेल्या तरुणाचे नाव अक्षय संजय कुंभारकर वय २५ रा. वनपुरी ता. पुरंदर असे आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक ३० रोजी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव मेमाणे येथे दुपारच्या दरम्यान आरोपी सुनील सावंत याने अक्षय कुंभारकर यांस दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून शिवीगाळ व हातापायाने मारहाण करून तलावात फेकून दिले.

या तरुणास गंभीर अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत अक्षय कुंभारकर यांचे भाऊ संजय कुंभारकर यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.आरोपी सुनील सावंत यांस पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे हे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *