पुण्यातील धक्कादायक प्रकार!!!प्रेयसीच्या घरात  शिरुन तिच्या पतीला पोलीस उपनिरीक्षकाने दिली जीवे मारण्याची धमकी

पुण्यातील धक्कादायक प्रकार!!!प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला पोलीस उपनिरीक्षकाने दिली जीवे मारण्याची धमकी

पुणे

अनैतिक संबंधावरुन एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना घडली.

प्रवीण नागेश जर्दे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जर्दे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण जर्दे हा सध्या कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होता. तिने हे प्रवीण जर्दे याला सांगितले. त्यावरुन १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जर्दे हा त्यांच्या घरात शिरला. त्याने फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली.

यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे. तसेच त्याने कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी व कुटुंबीय घाबरून गेले. त्यांनी कोथरुड पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी जर्दे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *