पुण्यातील खळबळजनक घटना!पुन्हा हिट अँड रन,गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना अज्ञात वाहनाने उडवलं,एकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी

पुण्यातील खळबळजनक घटना!पुन्हा हिट अँड रन,गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना अज्ञात वाहनाने उडवलं,एकाचा मृत्यु तर एक गंभीर जखमी

पुणे

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं आहे. बोपोडी परिसरामध्ये एका अज्ञात वाहनाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.समाधान कोळी असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

तर त्यांच्यासोबत दुसरे पोलीस पी. सी. शिंदे असे गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्या वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस कर्मचारी समाधान कोळी आणि पी. सी. शिंदे हे बीट मार्शल म्हणून खडकी परिसरामध्ये वस्तीवर होते. हरीश पुलाजवळ आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली.

यामध्ये कोळी यांचा गंभीर जखम लागल्याने घटनास्थळी मृत्यू झाला तर शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून खडकी पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *