पुणे विमानतळाबाबतीत अजित पवारांचे मोठे विधान !!!!!

पुणे विमानतळाबाबतीत अजित पवारांचे मोठे विधान !!!!!

पुणे

पुण्यातील विमानतळ बारातमतीला नेहणार असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. परंतु, पुण्यातील विमानतळ बारामतीला नेलं जाणार नाही. त्यामुळं उगाच सारखं बारामती, बारामती असं ओरडू नका, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विमानतळ कोणत्याही परिस्थित बारामतीला हलवणार नसल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज चाकण एमआयडीसी हद्दीत एका खासगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं होणार होतं. मात्र, आता ते विमानतळ बारामतीत होणार आहे. ते विमानतळ इथं झालं असतं तर आणखी पंचतारांकित हॉटेल इथं उभारली गेली असती. पण काही कारणास्तव विमानतळ बारामतीच्या हद्दीत जातंय.

पण आता आमच्या हद्दीत किमान डोमेस्टिक विमानतळ उभारावे. अशी मागणी मी अजित पवार यांच्याकडे केलीय असे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यावेळी म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील विमानतळ पुण्यातच होणार असल्याचे सांगितले.

विमानतळाच्या जागेसाठी सर्व्हे महत्वाचा असतो. सर्व्हेनंतरच विमानतळाची जागा निश्चित केली जाते. झालेलं विमानतळ चोवीस तास सुरू रहायला हवं, त्याअनुषंगाने जागा निश्चित केली जाते.

मुंबईनंतर सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने पुण्याकडे पाहिलं जातं. अशा ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे येतात. यासाठी येणारे उद्योगपती स्वतःचे विमान घेऊन येतात. त्यांना लगेच परतावे लागते. त्यामुळे पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणे गरजेचे आहे. मुंबईतील विमानतळाचा भार कमी करण्यासाठीचं नियोजन सुरु आहे.

पुण्यातील विमानतळ कुठं व्हावं याची पाहणी केंद्रीय हवाई मंत्रालय करत आहे. मुख्यमंत्री देखील यावर लक्ष देऊन आहेत. या सर्वांकडे माझी मागणी आहे की आता या विमानतळाचे काम तातडीनं सुरू करावे, जास्तीची दिरंगाई आता टाळावी, असे अजित पवार म्हणाले.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *