पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना!  १४ वर्षीय बालकाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

पुणे जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना! १४ वर्षीय बालकाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

पुणे

गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे.

आता अशीच काहीशी घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. १४ वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.वेदांत धामणगावकर असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागल्यामुळे त्याने त्याच्या वडिलांना कळवले. वडिलांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी वेदांतचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *