पुणे जिल्ह्यातील “हा” महावितरणचा कर्मचारी विज बिलाचे एैंशी हजार घेऊन झाला पसार?????

पुणे जिल्ह्यातील “हा” महावितरणचा कर्मचारी विज बिलाचे एैंशी हजार घेऊन झाला पसार?????

दौंड

दौंड तालुक्यातील यवत येथील गणेश तुकाराम गायकवाड यांनी सुमारे आठ महिन्यापुर्वी महावितरणचा कर्मचारी (लाईनमन) विजय टेकाम यांच्याकडे वीजबिल नव्वद हजार रुपये जमा केले. परंतु विजय टेकाम यांनी आजतागायत ते भरले नसल्याने माझा विद्युत पुरवठा खंडीत न करता विजय टेकाम यांच्याकडुन ती रक्कम जमा करुन घ्यावी असा अर्ज दिला आहे.

विजबिल भरणा करणे हे ग्राहकाचे स्वत:चे काम असुन विजबील भरण्यासाठी मोबाईलवरुनही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विजय टेकाम यांनी नव्वद हजार रुपये विजबील घेऊन ते भरले नसल्याची तक्रार आली आहे सदर प्रकरणी विजय टेकाम यांच्यावर निलंबनाची प्रक्रिया सुरु असल्याचे कनिष्ठ अभियंता काकडे यांनी सांगीतले.

तक्रारदार गणेश गायकवाड यांनी स्वत:हुन विजय टेकाम यांना पैसे दिले असल्याने या गोष्टीत तुम्ही स्वत: जबाबदार असुन विजबिल भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडीत केला जाईल असा लेखी सल्लाही महावितरणने दिला आहे.

सद्यस्थितीत विजबील न भरणार्या शेतकर्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम चालु असुन अनेक ठिकाणी शेतकरी महावितरण कर्मचार्यांकडे थकीत देय जमा करत आहे.परंतु महावितरण सदर प्रकरणी हात झटकत असुन विजबील देय हे कर्मचार्यांकडे द्यावे का? असा प्रश्न पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *