पुणे जिल्ह्यातील “या” गावात आलिशान सोसायटीच्या वॉचमनचा “प्रताप”; सोसायटीत लावली गांजाची झाडं

पुणे जिल्ह्यातील “या” गावात आलिशान सोसायटीच्या वॉचमनचा “प्रताप”; सोसायटीत लावली गांजाची झाडं

पुणे

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न पडण्यासारख्या कित्येक घटना गेल्या अनेक दिवसांमध्ये घडत आहेत. यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. पुण्यातील एका आलिशान सोसायटीमध्ये 23 वर्षीय तरुणाने चक्क गांजाच्या झाडांची लागवड केल्याचं उघडकीस आलं आहे.


या प्रकरणी संबंधित तरुणाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथील निर्मल टाऊनशिप नावाच्या आलिशान सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सोसायटीचा सुरक्षारक्षक पप्पू चुनकौना निशाद (वय २३, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या खास खबऱ्यामार्फत त्यांना याविषयी टीप मिळाली. निर्मल टाऊनशिप येथील सुरक्षा रक्षक राहत असलेल्या पत्र्याच्या शेडमागे दोन गांजाची झाडे लावली असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार, पाच पथकाला शोध घ्यायला सांगण्यात आलं.

सहायक पोलीस निरीक्षक अब्दागिरे, पोलीस अंमलदार नितीन शिंदे, केसरकर, थोपटे, राऊत, झुंजार, पंधरकर हे निर्मल टाऊनशिप येथे गेले असता सुरक्षारक्षक पप्पु याच्या पत्र्याच्या शेडच्या मागे गांजाची हिरवी झाडे लावलेली दिसून आली. ही झाडं कशाची आहेत, अशी विचारणा आरोपीकडे केली असता त्याने ही झाडं गांजाची असून आपणच लावल्याशी कबुली दिली.

पोलिसांनी या झाडांचं वजन पाहिलं असता 94 ग्रॅम ची ही झाडं असल्याचं समोर आलं.दरम्यान या प्रकरणी पोलीस अंमलदार नितीन शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंमली वनस्पतीची बेकायदेशीरपणे लागवड केल्या प्रकरणी सुरक्षारक्षक पप्पु निशाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *