पुणे जिल्ह्यातील “या” गावचा अभिनव उपक्रम!!!                   जि.प. शाळेतील शिक्षकाचा उपक्रम, गावकऱ्यांची साथ;प्रत्येक घरावर लागली मुलींच्या नावाची पाटी

पुणे जिल्ह्यातील “या” गावचा अभिनव उपक्रम!!! जि.प. शाळेतील शिक्षकाचा उपक्रम, गावकऱ्यांची साथ;प्रत्येक घरावर लागली मुलींच्या नावाची पाटी

पुणे

जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव या गावात तब्बल ३०० घराना या नेम्पलेट लावण्यात आल्या आहेत. त्या शिक्षकाच्या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.समाजात “मुलगा मुलगी भेद नको-मुलगी झाली खेद नको” या नुसार पालकांनी मुलींच्या जन्माचे स्वागत करत मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावे, मुली कुटुंबाचा आधार व अभिमान आहेत.

मुलगी शिकली, प्रगती झाली म्हणून शिक्षकांच्या संकल्पनेतून मुलींच्या सन्मानार्थ हिवरे तर्फे नारायणगाव येथे संजय रणदिवे या शिक्षकाने हा उपक्रम राबवला आहे.विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आंनददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा प्रारंभ राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने हिवरे जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला.

बेटी पढाओ,बेटी बचाओ ,मुलगा मुलगी एक समान या केवळ घोषणा न राहता मुलींचा सन्मान करण्यात यावा या हेतूने गावातील तब्बल तीनशे घरांवर मुलींच्या नावाच्या नेमप्लेट आम्ही जिजाऊ, सावित्री, रमाईच्या लेकी या नावाने झळकल्या आहेत.

प्रत्येक घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.पुरुष प्रधान संस्कृतीत मुलांच्या नावांचा अट्टाहास दिसतो. पण घरावर मुलांइतकाच मुलींचाही अधिकार असल्याचे प्रतीक म्हणजे नेमप्लेट असल्याने व मुलीच्या नावाने घराला वेगळी ओळख मिळणार असल्याने या उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रत्येक घरात सकाळी मुलींना पाटावर उभे करून पाय धुतले,औक्षण करून गोड भरविले आणि तिच्याच हस्ते तिच्या घरावर तिच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली.

कुटुंबातील मुलीचा सन्मान म्हणून सर्वजण या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते.मुलगी म्हणजे परक्याचे धन समजले जाते. आई वडिलांची लाडाची लेक विवाहानंतर सासरी जाते आणि तिची माहेरची ओढ हळूहळू कमी होते.

वडीलांच्या घरी तिचा योग्य सन्मान राखला जावा आणि आणि वडिलांनाही कन्यारत्न असल्याचा कायम अभिमान रहावा या हेतूने हा उपक्रम प्रेरक असल्याचे रणदिवे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *