पुणे जिल्ह्यातील भयंकर अपघात ; भलामोठा कंटेरन पुलावरुन दुभाजक मोडून थेट खाली रस्त्यावर कोसळला

पुणे जिल्ह्यातील भयंकर अपघात ; भलामोठा कंटेरन पुलावरुन दुभाजक मोडून थेट खाली रस्त्यावर कोसळला

पुणे

पुणे-बंगळुरु महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघतात कंटेनर थेट बावधनच्या पुलावरुन खाली रस्त्यावर कोसळला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रकचालक जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु महामार्गावरुन हा कंटेनर जात होता. अचानक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकला जाऊन धडकला.

धडक एवढी जोरदार होती की कंटेनर दुभाजक मोडून थेट पुलाखाली कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कंटेनर चालक जखमी झाला आहे.

अपघात घडला त्यावेळी पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यावरून कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. कंटेनर कुठे जात होता? अपघात कसा झाला? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *