पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!!        प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराच्या डोळ्यात प्रेयसीच्या आईने टाकली  मिरची पूड; प्रेयसीच्या भावांनीही दिला प्रियकराला चोप

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार !!!! प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराच्या डोळ्यात प्रेयसीच्या आईने टाकली मिरची पूड; प्रेयसीच्या भावांनीही दिला प्रियकराला चोप

पुणे

पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकरावर प्रेयसीच्या आईने डोळ्यात मिरची पूड फेकून गंभिर जखमी केल आहे.

तर प्रियसीच्या भावांनी देखिल प्रियकराला लोखंडी रॉडने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल आहे.पिंपरी चिंचवड शहरातील प्रेम लोक पार्क येथील नीलकंमल सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विशाल कसबे नामक प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. विशालवर सध्या मोरया रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

या प्रकरणात विशालचा भाऊ छत्तू कसबे यांनी विशालच्या प्रेयसीची आई व दोघा भावा विरोधात चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.विशालच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चिंचवड पोलिसांनी प्रेयसीची आई व तिच्या दोन अल्पवयीन भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *