दौंड
दौंड तालुक्यातील कानगाव येथे एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून एक वर्षापासून घरी कोण नसल्याचा गैरफायदा घेत सातत्याने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
पाटस पोलीसांनी या नराधमाला तत्काळ अटक केली आहे. अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
मयूर पांडुरंग फडके ( वय १८, रा.कानगाव, ता. दौंड )असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत मुलगी ही अकरा वर्षाची असून या नराधमाने फेब्रुवारी २०२१ पासून मार्च २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत पाच रुपये व वीस रुपये खायला देतो असे अमिष दाखवून आणि घरातील शेतात किंवा बाहेर गेल्याचा गैरफायदा घेवून सातत्याने लैगिंक अत्याचार केला.
पिडीत मुलगी ही शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या वाजण्याच्या सुमारास घराजवळील किराणा दुकानात डिंकाची बाटली आणण्यासाठी गेली होती.यावेळी आरोपी या मुलीशी सिद्धीसिद्धी वॉटर फिल्टर समोर काहीतरी बोलत असल्याचे पिडीत मुलीच्या आईने पाहिले. यावेळी ती घरी आल्यावर विचारले की तो काय म्हणत होता.
तेव्हा ती म्हणाली आपण पहिले केलं तसं आज होईल का ? तेंव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला.या नराधमाने अत्यंत नालायकपणे या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
याबाबत पिडीत मुलीच्या आईने पाटस पोलीस चौकीत धाव घेतली आणि सगळा प्रकार सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांना सांगितला.
केशव वाबळे यांनी घटनेचे गांर्भीय ओळखून व क्षणाचा विलंब न लावता आरोपीला बेड्या ठोकून जेलमध्ये रवानगी केली.
पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते,दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या घटनेचे तपास करीत आहे.