पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना!!!   पती दररोज जेवनात त्रुटी काढतो म्हणून पत्नीला आला राग;”या” गावात कांदा कापण्याच्या सुरीनेच पतीला भोकसले

पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना!!! पती दररोज जेवनात त्रुटी काढतो म्हणून पत्नीला आला राग;”या” गावात कांदा कापण्याच्या सुरीनेच पतीला भोकसले

पुणे

पती दररोज जेवणात त्रुटी काढतो म्हणून पत्नीला राग अनावर झाला. याच रागातून तिने कांदा कापण्याच्या चाकूने पतीवर हल्ला केला. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.नमिता (वय ३३) असं वार करणाऱ्या महिलेचं नाव असून श्रवण (वय ३३ ) असं जखमी झालेल्या पतीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने पती-पत्नी हडपसरमधील झेड कॉर्नर मांजरी परिसरात राहतात.

त्यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होते.पती श्रवण हा आपण बनवलेल्या जेवणाला नेहमीच नाव ठेवतो, असा राग पत्नी नमिताच्या मनात होता. गुरुवारी (१ फेब्रुवारी) नमिता नेहमीप्रमाणे किचनमध्ये स्वयंपाक करीत होती. त्याचवेळी श्रवण हा कामावरून घरी आला. अजूनही जेवण का बनवलं नाहीस? असं म्हणत श्रवणने नमितासोबत वाद घातला.

दरम्यान, स्वयंपाक बनवल्यानंतरही श्रवण आणि नमितामध्ये वाद सुरूच होता. आजही तू चांगलं जेवण बनवलं नाहीस, असं म्हणत श्रवणने जेवणात त्रुटी काढली. याचा पत्नी नमिताला राग आला. याच रागाच्या भरात तिने कांदा कापणाऱ्या सुरीने श्रवणवर हल्ला केला.या हल्ल्यात श्रवण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *