पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार! “या” गावात तब्बल अठ्ठयाऐंशी लाख रुपये परत करुनही सावकाराकडून कर्जदारास जिवे मारण्याची धमकी

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक प्रकार! “या” गावात तब्बल अठ्ठयाऐंशी लाख रुपये परत करुनही सावकाराकडून कर्जदारास जिवे मारण्याची धमकी

पुणे

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ८८ लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड करूनही सावकाराने कर्जदारास वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सावकारासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.राहुल ऊर्फ दिगंबर पुरुषोत्तम काची (वय ३७), सुजित सुधीर लाजुळकर (वय ३४), विकी ढवळे (वय ३५), जयकुमार सदाशिव पाटील (वय ४०), बाळासाहेब ऊर्फ नितीन करंडे (वय ४२), अक्षय सागर, निखिल आल्हाट, संतोष उत्तम सोळसे (वय ३७) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार एका शिक्षण संस्थेत शिपाई आहे. कोरोना काळात तक्रारदाराने सावकाराकडून एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज वाढत असल्याने तक्रारदाराने दुसऱ्या व्यक्तींकडून कर्ज काढत पहिल्या व्यक्तींच्या पैशांची परतफेड केली.

तक्रारदाराने १० ते ४० टक्के व्याजासह ८८ लाख २५ हजार रुपये परत केले. परंतु आरोपी मुद्दल आणि व्याजाची मागणी करीत होते. आरोपींनी कर्जरादाराकडून १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने देखील घेतले. ते देखील परत केले नाही.

दरम्यान, अतिरिक्त व्याजाची रक्कम दिली नाही म्हणून आरोपींनी तक्रारदाराला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. अखेर या धमक्यांना कंटाळून तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सावकारासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *