पुणे
सध्या गावागावात गणपतीचा उत्साह सुरू आहे. त्यातच या गणेश उत्सवाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथे एका कुटुंबाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
माझ्या मुलाचे निधन झाले आहे. त्यामुळे माझ्या घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डीजे वाजवू नका असे म्हटल्याने २१ जणांनी काठ्या, कोयता, लोखंडी सळई ने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे. सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. याबाबत सुनील प्रभाकर शिंदे यांनी तळेगावदाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सुनील बंदा रजपूत (वय २८), मुकेश करसन रजपुत (२६), रवी करसन रजपुत (३०), सनी करसन रजपुत (३२), प्रवीण करसन रजपुत (३०), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (२८), अतुल वेलसी रजपुत (२१), कृष्णा बलभीम खराते (२३), रवी हिरा रजपुत (२८), संदीप रमेश रजपुत (२९), विशाल काळुराम रजपूत (२९), संतोष काळुराम रजपूत (२५), विलास हिरा रजपूत (२२), अनिल हिम्मत रजपूत (३१), करसन जयंती रजपूत (५०), दिपक हिम्मत रजपूत (३२), आकाश अशोक रजपूत (२१), काळुराम भिका रजपूत (५५), वसंत भिका रजपूत (५१), अमित वेलसी रजपूत (२४) आणि रमेश जयंती रजपूत (५०, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांना अटक करण्यात आली आहे.