पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!!                          दारु पिऊन सारखा त्रास देतो म्हणून “या” गावात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा दगडाने ठेचून खून

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !!! दारु पिऊन सारखा त्रास देतो म्हणून “या” गावात प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा दगडाने ठेचून खून

पुणे

दारू पिऊन सातत्याने त्रास देतो या कारणास्तव पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा दगडाने ठेचून खून करत मृतदेह शेजारील विहिरीत फेकून दिला असल्याची खळबळजळ घटना दौंड तालुक्यातील भांडगाव येथे घडली आहे.

याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी सुनिल पांडुंरंग जगताप (वय 42 वर्ष, रा भांडगाव ) हे हरवले असल्याची तक्रार त्यांची पत्नी शितल जगताप यांनी यवत पोलीस स्टेशनला दाखल केली होती.

ही तक्रार तपासासाठी पोलीस नाईक नारायण भिमराव जाधव यांच्याकडे दिली.पो. ना. नारायण जाधव यांनी दि 18 मे रोजी खबर देणार शितल सुनिल जगताप,अतुल प्रभाकर चैघुले व शेजारील इतर साथीदार यांचेकडे विचारपुस केली असता, असे समजले की,शितल जगताप व अतुल चैघुले यांचेत प्रेम संबंध होते.

शितल यांचे पती सुनिल जगताप हे सतत दारू पिवुन तिला त्रास देत असत असे तपासात निश्पण्ण झाले. त्यानंतर दि.18 मे रोजी शीतल जगताप यांच्या घरापासुन पुर्वेस असणा-या बाळासाहेब भिनताडे यांच्या विहीरीमध्ये शितल जगताप याचे पती सुनिल जगताप याचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना मिळाले.

तसेच सदर प्रेत विहीरीतुन बाहेर काढल्या नंतर पो. ना. नारायण जाधव व पोलीस उपनिरीक्षक प्रशात मदने यांनी पाहणी केली असता सदर प्रेताच्या डोक्याला जखम असुन त्यावरून खात्री झाली कि मयत सुनिल पांडुंरंग जगताप (वय 42 वर्ष रा भांडगाव) याचा कोणीतरी खुन केला आहे.

त्यानंतर यातील मिसिंग खबर देणार महीला शितल सुनिल जगताप(रा.भांडगाव,ता. दौंड) व अतुल प्रभाकर चौगुले (सध्या रा भांडगाव ता.दौंड, मुळ रा पाटेठाण ता.दौंड)यांचेकडे वेगवेगळी विचारपुस केली असता दोघांनीही यातील मयत सुनिल पांडुरंग जगताप यांस संगणमत करून दि.15 मे रोजी पहाटे 5ः00 च्या सुमारास घरासमोर झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड घालुन विहीरीत टाकुन त्याचा खुन केला.तसेच रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ठ केल्याचे पोलीस निष्पन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *