पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून सरपंचाने केली होती मारहाण,त्यामुळे सहा महिने येरवडा काराग्रह आणि आता सरपंच पदाबरोबर झाले सदस्य पदही रद्द

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून सरपंचाने केली होती मारहाण,त्यामुळे सहा महिने येरवडा काराग्रह आणि आता सरपंच पदाबरोबर झाले सदस्य पदही रद्द

पुणे

वेगरे (ता.मुळशी) येथीलसरपंचांवर मोठी कारवाई झाली असून अखेर त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचा आदेश नुकताच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(1अ व,2) अन्वये दिला आहे. त्यामुळे तत्कालीन कुप्रसिद्ध विद्यमान सरपंच मिनाथ मारुती कानगुडे यांना सरपंचपदावरून हटविण्याबरोबरच त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की वेगरे ग्रामपंचायतीच्या 29 एप्रिल 2022 च्या तहकूब ग्रामसभेत माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग विचारलेच्या कारणावरून तत्कालीन सरपंच तथा सभेचे अध्यक्ष कानगुडे व त्याच्या साथीदारांनी भाऊ मरगळे यांच्या वर दगड, दांडके, सुरा व कोयत्याने साहाय्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते .व उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना देखील कानगुडे याच्या साथीदारांनी मरगळे यांची गाडी अडवून फोडली होती.याबाबत पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेवरून कानगुडे व त्याच्या साथीदारांना 30 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते सहा महिने येरवडा कारागृहात होते.

जिल्हा न्यायालयाने त्यांचा दोन वेळा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये जामीन मंजूर केला परंतु पुढील आदेश होइपर्यंत वेगरे गावात येण्यास मनाई केली आहे.त्यामुळे ते मे 2022 ते ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या वेगरे ग्रामपंचायतीच्या सलग सहा मासिक सभांना अनुपस्थित होते व त्या कालावधीत एकदाही गावात आले नाहीत.

यामुळे वेगरे चे माजी सरपंच भाऊ पांडुरंग मरगळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40 (1अ ,व 2) नुसार कानगुडे यांचेवर कारवाई व्हावी यासाठी 2 सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद पुणे यांचे कडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली होती.त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांनी ग्रामपंचायत वेगरे च्या चौकशी चे आदेश दिले होते .

याबाबत गट विकास अधिकारी मुळशी यांनी चौकशी करून सविस्तर अहवालदिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद पुणे यांचेकडे सादर केला .यानुसार 9 नोव्हेंबर 2022 व 11 जानेवारी 2023 रोजी याबाबत प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली.यावेळी कानगुडे यांच्या वतीने वकिलांनी म्हणणे मांडले तर मरगळे यांनी स्वतः युक्तिवाद केला .

सबब उपरोक्त कारणमीमांसाचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष्य प्रसाद यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(1अ,2) नुसार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पासून मिनाथ मारुती कानगुडे यांना वेगरे गावचे सदस्य पदी राहणेस अपात्र ठरविले असून सरपंचपदावरून हटविण्या बरोबरच त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्वही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

यावेळी भाऊ मरगळे म्हणाले सदरचा निकाल 60 दिवसात देणे बंधनकारक असतानाही तब्बल 150 दिवसांनी उशिरा का होईना आदेश दिलेबद्दल सदरच्या निकालावर समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *