पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!!          “या” गावात बहिणीची छेड काढतो,आईला अश्लील भाषेत बोलतो म्हणून डोक्यात दगड घालूनच तरुणाची केली हत्या

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!! “या” गावात बहिणीची छेड काढतो,आईला अश्लील भाषेत बोलतो म्हणून डोक्यात दगड घालूनच तरुणाची केली हत्या

पुणे

नाती फार अनमोल असतात. वाईट शब्दांनी आई, वडील आणि भावंडांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. व्यक्तीच्या मनात राग भरतो आणि रागाच्या भरात मोठ मोठे गुन्हे घडतात.

अशात खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खेड तालुक्यातील चांडोली येथे बहिणीची छेड काढतो, आईला अश्लील भाषेत बोलतो, या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, मृतदेह पाच दिवस बंद खोलीतच राहिल्याने ओळखही पटणं अशक्य झालं.याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल अशोक इंगुले (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) असं मृत तरुणाचं नाव आहे. आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील फळ उत्पादन रोपवाटिकेत त्याचा खून झाला होता.

गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा हाती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते.घटनास्थळी पोहचत पोलिसांनी बारकाईने पाहणी केली परंतु, हत्या केलेल्या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी कोणताही पुरावा त्या ठिकाणी मिळाला नाही.

त्यामुळे हत्या झालेल्या तरुणा त्याच्या वारसांचा आणि आरोपींचा शोध घेणे कठीण होते. अखेर राजगुरुनगर पोलीसांनी पाच आरोपींना अटक केलीय यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *