पुणे जिल्हा हादरला! “या” गावात पती- पत्नीने विहिरीत उडी मारत केली आत्महत्या

पुणे जिल्हा हादरला! “या” गावात पती- पत्नीने विहिरीत उडी मारत केली आत्महत्या

पुणे

जुन्नर तालुक्यातील पिपंरी पेंढारच्या नवलेवाडी येथे विहिरीत उडी मारुन पती पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. ओतुर पोलिसांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

पती पत्नीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की,जुन्नर तालुक्यातील पिपंरी पेंढारच्या नवलेवाडी या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत धनगर समाजातील पती-पत्नीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पती पत्नीने एकाचवेळी आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ओतुर पोलीस आणि जुन्नर रेस्क्यु टीमच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतुन बाहेर काढून शवच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून ओतूर पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पती पत्नीने दोघांनीही एकाचवेळी असा टोकाचा निर्णय का घेतला, ही आत्महत्या की घातपात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *