धीरज जगतापला अटक

धीरज जगतापला अटक

मुंबई

उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा विषय चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात आणखीन एक अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव धीरज जगताप असून तो महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राहणार आहे. धीरज जगतापला दहशतवादी विरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या कानपूर मधून अटक केली आहे.

अवैधरित्या धर्मांतरण करण्यासाठी धीरजकडून व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आले होते. त्यामधून तो धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत होता अन् अवैध्यरित्या धर्मांतर करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. तो पुसद शहरातील वसंत नगर भागात राहणारा डॉक्टर फराज शहा सोबत धर्मांतराचे काम करत होता. डॉ. फराज याला लखनऊ एटीएसने दीड महिन्यापूर्वी पुसद शहरातून अटक केली. त्यानंतर धर्मांतरासाठी काम करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला.

यानंतर पुढे राज्यासह देशभरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. याच कारवाईचा भाग म्हणून शुक्रवारी यवतमाळ शहरातील धीरज जगताप या युवकाला कानपूर मध्ये अटक झाली.

धीरज यवतमाळ मध्ये कंत्राटदार म्हणून काम करत होता. मात्र काही दिवसानंतर त्याने धर्मांतर करून तो घराबाहेर पडला तो घरी फिरकत नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन निघून गेली. लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळातील स्थानीक एटीएसच्या पथकाने धीरजच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली. मात्र त्याचे त्याचे वृद्ध वडील आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *