पुणे
ॲमेझॉन ॲपवरून ६० हजार रुपये किमतीचा कॅमेरा मागवला असता त्याजागी साबण, बॅटरी, चार्जर व इतर वस्तू आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे त्या वस्तू बदलवून देण्यास देखील कंपनीने नकार केला आहे. प्रशांत लेंडवे या तरुणाने ॲमेझॉन ॲपवरून कॅनोन एम फिफ्टी मार्क टू या कंपनीचा कॅमेरा ऑनलाईन हप्त्यावर खरेदीसाठी ऑर्डर दिली.
सायंकाळी आल्यावर आलेले पार्सल खोलून पाहिले असता त्यात सर्फ एक्सेल कंपनीचा साबण, कॅनन कंपनीचा बॅटरी चार्जर, चार्जर केबल, कॅनोन कंपनीची कॅमेरा कॅरिअर रस्सी आणि स्टील फ्लेक्सिबल पाईप अश्या वस्तू मिळून आल्या.
याप्रकरणी ॲमेझॉनच्या ग्राहक केंद्राला तक्रार केली असता ऑर्डर परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे तरुणाने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.