औरंगाबाद
चोरटी वाळू वाहतूक करत असलेल्या वाळु माफीयांनी पिशोर पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे ही घटना घडली. पोलीस कॉन्स्टेबलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंचोली शिवारातुन मध्यरात्री पुर्णा नदीपात्रातुन वाळुची चोरटी वाहतुक करतांना पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्सटेबल सुनिल भिवसने यांची टिमने त्या ठिकाणी जाऊन ट्रॅक्टर पकडण्यासाठी सापळा रचला.
वाळुने भरलेला ट्रॅक्टर येत असतांना हात दाखवुन थांबवण्याचे सांगितले. परंतु ट्रॅक्टर चालक जिवे मारण्याच्या प्रयत्नातुन भिवसने आणि त्यांच्या टिमवर ट्रॅक्टर घातले.यात पोलीस कॉन्स्टेबल सुनिल जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नाचनवेल आदर्श हॉस्पीटल कन्नड येथे दाखल केले.
परंतु त्यांच्या पायाला, डोळ्याला इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टर चालक, मालक सुनिल जाधव तसेच बाळु पवार यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.