कोल्हापूर
कोल्हापुरात एक अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. येथे नागरीकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसाकडूनच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे.
कोल्हापीर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील ही संतापजनक घटना घडली आहे.
राजेंद्र गणपती पाटील असं अत्याचार करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. राजेंद्र पाटील हा पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावचा आहे.
संबंधित पोलीस हा मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे.अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
आरोपी पाटील विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एका पोलिसानेच असे कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.