धक्कादायक!!!!!! पोलिस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्य संपवले,गळफास घेण्यापूर्वी रेकॉर्ड केला व्हिडिओ;माझ्या आत्महत्येला…

धक्कादायक!!!!!! पोलिस पाटलाने ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्य संपवले,गळफास घेण्यापूर्वी रेकॉर्ड केला व्हिडिओ;माझ्या आत्महत्येला…

पुणे

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालूक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षकाने अन्याय केला, असा आरोप करत एका पोलीस पाटलाने ग्राम पंचायत कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी हदगाव तालुक्यातील पेवा गावात ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी पोलीस पाटलाने व्हिडिओ देखील केले. बालाजी जाधव असे पोलीस पाटलाच नाव आहे. या घटनेने हदगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मृतक बालाजी जाधव हे हदगाव तालुक्यातील पेवा गावातील पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी बालाजी जाधव हे ग्राम पंचायत कार्यालयात आले. कार्यालयात कोणी नसताना त्यांनी कार्यालयातच गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी मोबाईल एक व्हिडिओ केला. त्यात त्यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला.पोलीस निरीक्षक भडीकर यांनी माझ्यावर अन्याय केला आहे.

भडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता, मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असे मयत बालाजी जाधव व्हिडीओत म्हणाले. माझ्या आत्महत्येला पोलीस निरीक्षक हे जवाबदार असल्याच त्यांनी सांगितले. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत नातेवाईकानी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. जो पर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.

घटनेची माहिते मिळताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मयत जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी जावई असा परिवार आहे.

हदगाव पोलीस ठाण्यातील पेवा गावात १५ दिवसा पूर्वी एकाचा खून झाला होता. या घटनेतील आरोपीबद्दल पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली, असा पोलिसाचा समज होता. त्यातून पोलीस निरिक्षक भडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारना केली होती. त्यातून हा संपूर्ण प्रकार घडला,असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *