धक्कादायक !!!!!!  पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या स्मशानभूमीत  अघोरी कृत्य;दृश्‍य पाहून ग्रामस्‍थांच्‍या पायाखालची जमीनच सरकली

धक्कादायक !!!!!! पुणे जिल्ह्यातील “या” गावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य;दृश्‍य पाहून ग्रामस्‍थांच्‍या पायाखालची जमीनच सरकली

पुणे

खेड तालुक्यातील रेटवडी येथील वैकुंठ स्मशानभूमीत धक्कादायक अघोरी कृत्य करण्यात आले आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे कृत्य करणाऱ्या पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अघोरी विद्येच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे, नरबळी देणे, पैशाचा पाउस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे असे अंधश्रद्धेचे प्रकार आपण नेहमी ऐकतो.

रेटवडी (ता. खेड) येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (१७ जुलै) अमावस्या असल्‍याने स्‍मशानभुमीत हा प्रकार पहावयास मिळाला आहे.अमावस्‍या असल्यामुळे गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय, काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले.

सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध असा प्रकार करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *