धक्कादायक!!!! काळजाचा थरकाप उडवणारी घटना.दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…फक्त मित्राला ढकलल अन जागेवर गेला जीव

धक्कादायक!!!! काळजाचा थरकाप उडवणारी घटना.दोस्ताची थट्टा दोस्ताच्या जीवावर…फक्त मित्राला ढकलल अन जागेवर गेला जीव

नाशिक

एका मित्राने केलेली थट्टा मस्करी दुसऱ्या दोस्ताच्या चक्क जीवावर बेतल्याचा प्रकार घडला आहे. अरे, असा काय बसला आहेस म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राला ढकलले. मात्र, या घटनेत दुसऱ्या मित्राचा जागेवरच जीव गेला. काळजाचा थरकाप उडवणारी आणि जीवाला चटका लावणारी ही घटना शहरातल्या शिवाजीवाडी भागात घडली. संतोष विष्णू वांगाडे ( वय 36) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विष्णू पवारला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

शिवाजीवाडी भागात महापालिकेची शाळा आहे. याच भागामध्ये संतोष विष्णू वागांडे यांचे घर आहे. संतोष रोज शाळा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी येतात. शनिवारीही ते शाळा परिसरात आले होते. ते नेहमीप्रमाणे शाळा परिसरातील वाळूच्या ढिगाऱ्यावर बसले होते. नेमके त्याचवेळी त्यांचा मित्र विष्णू किसन पवार (वय 35, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) हा तिथे आला. त्याने संतोष यांच्याशी नेहमीप्रमाणे थट्टा मस्करी सुरू केली. या थट्टेतच त्यांनी संतोष यांना अजून घरी गेला नाहीस का, म्हणत जोराचा धक्का दिला. या धक्क्याने संतोष जमिनीवर पडले.

त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच जीव गेला. मित्राच्या हाताने मित्राचाच असा नकळत जीव जावा, या दुर्दैवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विष्णू किसन पवारला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *