धक्कादायक !!!!!   अंकित यादवने पाटलांची गाडी दिली पेटवुन

धक्कादायक !!!!! अंकित यादवने पाटलांची गाडी दिली पेटवुन

पिंपरी चिंचवड

बॉसचा राग आला, तर एखादा कर्मचारी काय करु शकतो? ऑफिसला दांडी मारणं, कामात मुद्दाम चुका करणं, वरिष्ठांकडे त्याची तक्रार करणं, कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोकाच्या रागाचं कारणही स्पष्ट झालं आहे.

मालकाने पगाराचे 40 हजार रुपये दिले नाहीत, म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी जाळल्याची घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी कर्मचारी अंकित यादव याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

अंकित यादव हा मालक गणेश उंदरे पाटील यांच्याकडे सिमेंट ब्लॉक बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. पगार मिळाला नाही, म्हणून दारुच्या नशेत त्याने पाटलांची गाडी पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *