दुर्दैवी!!!!!!!            बैल आणण्यासाठी गेला अन् काळाने घातला घाला

दुर्दैवी!!!!!!! बैल आणण्यासाठी गेला अन् काळाने घातला घाला

पुणे

बैलपोळा असल्याने 14 वर्षाचा मुलगा बैल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे घडली. या घटनेमुळे वडगाव मावळसह पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. राज भरत देशमख असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बैल पोळा असल्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राज बैल आणण्यासाठी गेला होता.

त्यावेळी वीज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने राजचे वडील भरत देशमुख यांनी जाऊन पाहिले. त्यावेळी खांडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली राज पडलेला दिसला.

भरत देशमुख यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या कानातून व नाकातून रक्त आले होते. तर डोक्यावरचे केस जळाले होते.

घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले
उपनिरीक्षक विजय वडोरे किरण नांगरे, सिद्धार्थ वाघमारे, सचिन काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वीज पडल्याचे लक्षात येताच राजला कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *